भगवान गौतम बुदध

तुझ्या औदर्याची दीप्ती
प्रथमदर्शीनी,
वात ह्रदयात आशेची अशी
पेटवूनी गेली

औदासीन्य आयुष्याचे आज
पाणी सोडले त्याच्यावरी
या निर्विकार मनाला ती
उदयुक्त करुनी गेली

तो कोवळा अंशु असो वा
मावळतानाचा संधीप्रकाश
परि तुझ्या सौजन्यशीलाने
विश्व आरक्त करुनी गेली

प्रशंसा तुझी अवीरत
ईश्वरांश विदयमान
अन्वेषण आयुष्याचे करुनी
ही दीप्ती जग जिंकूनी गेली

Leave a comment